दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या सर्वात मोठी मोठी समजली जाणारी व विकास कामांच्या बाबतीत एक नंबर असणारी ग्रामपंचायत निमगाव केतकी असून या ग्रामपंचायतच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे चालू असून,१५ व्या वित्त आयोग सन २०२१-२०२२ मध्ये वार्ड क्रमांक १ ते ६ मध्ये रस्त्यांच्या कामासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून हे रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करून शासनाचा निधी हडपण्याचे काम संबंधित ठेकेदार व अधिकार यांनी केलेले आहे.आणि या प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्याविरुद्ध आपण सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे असे मत शिवसेना उपतालुकाप्रमुख सोमनाथ शेंडे यांनी केले आहे.
कामे झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांत पूर्णपणे रस्ते उखडले असून सदर कामाची चौकशी होऊन संबंधित विभाग, ग्रामसेवक व संबंधित ठेकेदारांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी इंदापूर शिवसेना उपतालुकाप्रमुख सोमनाथ शेंडे यांनी केले आहे.
या मागणीचे निवेदन त्यांनी गटविकास अधिकारी निमगाव केतकी यांना दिले आहे. मार्च २०२१ ते आजपर्यंत झालेल्या कामांची ही चौकशी झाली पाहिजे तसे न झाल्यास इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,व होणाऱ्या परिणामांना आपण स्वतः जबाबदार रहाल असे यावेळी त्यांनी सांगितले.