दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
सांगली कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये दंडोबा परिसरांमध्ये २० लाख रुपये रकमेचे लपवून ठेवलेले हस्तीदंत कवठेमहांकाळ पोलिसांनी छापा टाकून चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये राहुल भीमराव रायकर (वय २८ रा.सपकाळ गल्ली बावडा कोल्हापूर) बालाजी हरिश्चंद्र बनसोडे ( वय ३० रा. विजयनगर कोल्हापूर) कासिम शमशुदीन काझी (वय २० खाजा वस्ती मिरज) व हनुमंत लक्ष्मण वाघमोडे ( वय ३९ राहणार लोणारवाडी ता.कवठेमहांकाळ ) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबले यांनी पत्रकारांना दिली. पोलीस नाईक चंद्रसिंग साबळे यांना खांस बातमीदाराकडूंन हस्तीदंताची खरेदी व विक्री बाबत माहिती मिळाली होती. डी.बी पथकांचे प्रमुख अमिरशा फकीर हे व त्यांचे सर्व सहकारी या घटनेवर करडी नजर ठेवून होते.खरशिंग गावानजीक दंडोबा डोंगराच्या पायथ्यांशी छापा टाकून चार आरोपींच्या मुद्देमालासह कवठेमहांकाळ पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सदरची कारवाई सोमवारी पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान करण्यांत आली. यामध्ये पोलिसांना या चार आरोपींकडूंन २० लाखाचे दोन हस्तीदंत ४० हजार रुपयांच्या दोन दुचाकी असा एकूण २० लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यांत कवठेमहांकाळ पोलिसांना यश मिळाले. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षितकुमार गेंडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबले, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र शहाणे, डी.बी पथकांतील पोलीस अधिकारी अमिरशा फकीर, पोलीस नाईक चंद्रसिंग साबळे, पोलीस फौजदार विजय घोलप, हवालदार केरबा चव्हाण, आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या या कारवाईबद्दल माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्वच सरांतून कौतुक होत आहे.