दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
केंद्र सरकार,राज्य सरकार व स्थानीक स्वराज्य संस्थामधील शासकीय कर्मचारी यांना सबंधीत प्रशासनाकडुन दर वर्षी दिवाळी बोनस मिळत असतो.परंतु स्वत:साठी कोनताही सन -वार साजरा न करता जनतेच्या सुरक्षेसाठी चोवीस तास आपल्या जिवाची बाजी लावुन काम करताना पोलिसांना मात्र बोनस देताना प्रत्येक वेळी डावलले जाते.दोन वर्षापुर्वी कोरोना काळात पोलीसांनी आपले जिव सुध्दा गमावले,राज्यात निर्मान होनारी कोनतीही आपत्कालीन परीस्थीती असो नेहमीच छातीचा कोट करुन सर्वसामान्य नागरीकांचे संरक्षन केले आहे.आपल्या न्यायहक्कांसाठी पोलिसांना युनीयन स्थापन करुन संघटनात्मक लढा देन्याची कायदेशीर परवानगी नसल्यामुळे,महाराष्ट्र पोलिस दलातील हा योध्दा आज निमुटपने आपल्यावरील अन्याय सहन करीत आहे.दरम्यान.29सप्टेंबर 2022 रोजी शिंदे-भाजप सरकारने मुंबई महानगरपालिकेसह बेस्ट कर्मच्यारी,शिक्षक व आरोग्य सेवकांना घसघसीत दिवाळी बोनस जाहीर केला.परंतु मा.मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना पोलिसांचाच कसा विसर पडला याची आठवन करुन देन्यासाठी दि.10.10.2022 रोजी पत्र पाठवले पुढे असेही नमुद करन्यात आले की,गेले वर्षी 2021 साली महाराष्ट्र शासनाकडुन पोलिसांना 750रु.चा बोनस जाहीर करन्यात आला होता.मात्र हा बोनस अत्यंत तुटपुंजा तर आहेच शिवाय अपमानास्पद देखील आहे.गेले वर्षी भाजप आमदार मंगलप्रभात लोंढा यांनी पोलिसांना 25ते50हजार रु बोनस देन्यात यावा अशा मागनीचे पत्र तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांना देन्यात आलं होतं,परंतु आज आपल्या भाजप सरकारचेच गृहमंत्री व आपलेच मुख्यमंत्री असताना पोलिसांना बोनस पासुन डावलल्याने खेद वाटने साहजीक आहे.तसे पोलिसांचे त्याच्यां घराच्या प्रश्नापासुन तसेच निवासी संकुलाची दुरावस्था पगाराचा विषय ,कामाचे तास अशी अनेक प्रश्न प्रलंबीत आहेतच.परंतु मा.भाजप आमदार लोढां साहेबांनी गेले वर्षी केलेली मागनी यंदा तरी पुर्न व्हावी व इत्तर शासकीय कर्मचारी यांच्या प्रमाणे महाराष्ट्र पोलिस दलातील या योध्यांना यंदाच्या वर्षापासुन तरी बोनस सुरु करुन त्यांची दिवाळी गोड करावी एवढीच माफक अपेक्षा.