दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण मंडळातर्फे शिष्यवृत्तीची अंतिम तारीख 30 /10 /2022 महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने या शैक्षणिक शिष्यवृत्ती सन 2022 – 23 या शैक्षणिक वर्षासाठी कामगारांच्या पाल याकरिता शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली अशी माहिती कामगार कल्याण अधिकारी प्रसाद दस साहेब मुंबई गिरणी कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 अंतर्गत मंडळाच्या कामगार कल्याण निधीचा वर्गणी भरणाऱ्या आणि गतवर्षी किमान 60 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या कामगारांच्या पाल्यास ही योजना लागू करण्यात आली आहे यात राज्य परिवहन वीज कंपनी बँक साखर कारखाने खत कारखाने सूतगिरणी आयुर्विमा महामंडळ कापूस पणन महाबीज महानंदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आधी आस्थापनातील कामगार कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे इयत्ता नववीचे पदवी पदवी पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा पालकाचे माहे जून 2022 चे पगार स्लिप. उत्तीर्ण वर्गाच्या गुणपत्रिका सत्यप्रत राशन कार्ड शिकत असलेल्या वर्गाचे बोनाफाईड मूळ संचिका व प्रमाणपत्राची कागदपत्रांची पूर्तता करणे या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक आहे अधिक माहितीसाठी व आजच जवळच्या कामगार कल्याण शी संपर्क व ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेण्यात येईल असे आव्हान कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस साहेब व कामगार कल्याण केंद्र देगलूर येथील कर्मचारी व्ही बी स्वामी यांनी केले आहे.