दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली व शहर चुनाव प्रभारी प्रा. नागेश्वर गंडलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात होणाऱ्या असुविधांचा आढावा घेऊन चंद्रपूर जिल्हा शल्य चिकित्सक राठोड साहेब यांना निवेदन मार्फत खालील प्रमाणे मागण्या करण्यात आले।
1) बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय ला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा.
2) श्रेणीवर्तन करून 50 बेड ची पूर्तता करण्यात यावी.
3) रेडिओलॉजी, ऑर्थोलॉजी, सोनोग्राफी या सारख्या आवश्यक मशीन ची सुविधा उपलब्ध करण्यात यावी.
4) तज्ञ वैद्यकीय चिकित्सकांची नेमणूक करण्यात यावी.
5) पाच बेड च्या ICU ची सुविधा करण्यात यावी.
या वेळी जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, कोषाध्यक्ष भिवराज सोनी जी, युथ जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, शहर चुनाव प्रभारी प्रो. नागेश्वर गंडलेवार, सचिव ज्योतीताई बाबरे, युवा शहराध्यक्ष सागर कांबळे, महिला शहर संघठक सरिताताई गुजर, सुधाकर गेडाम, राजू कूड़े, सुनील सतबए, रहमान भाई आणि इत्यादि उपस्थित होते।