दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
औरंगाबाद. औरंगाबाद जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हजर राहून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. अस्तिक कुमार पांडे यांची प्रशासन विभागांमध्ये शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची चांगलीच ओळख आहे. सुनील चव्हाण यांची विकास आयुक्त असंघटित कामगार मुंबई या पदावर नियुक्ती करण्यांत आली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा कार्यकाळ औरंगाबाद जिल्ह्यासाठी चांगलाच राहिला. आस्तिक कुमार पांडे यापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये मनपा आयुक्त या पदावर ते कार्यरत होते. त्यांनी ९ डिसेंबर २०१९ मध्ये औरंगाबाद मनपा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता त्यांनी आपल्या कामाची सुरुवात अगदी धडाकेबाज केली होती. काही महिन्यापूर्वीच महाराष्ट्रांत सत्तातरांचे महानाट्य सुरू असतानाच तत्कालीन ठाकरे सरकारने अखेरच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांची बदली करुन त्यांच्या रिक्त जागी डॉ.अभिजीत चौधरी यांची नियुक्ती केली होती तेव्हापासून पांडे यांच्याकडे कोणतेच पद नव्हते. औरंगाबाद शहरामध्ये अस्तिक कुमार पांडे आणि पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील मॅडम हे पती-पत्नी औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. आस्तिक कुमार पांडे यांनी यापूर्वी बीड अकोला यवतमाळ अशा विविध जिल्ह्यांमध्ये उत्कृंष्ट जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कामाचा चांगला ठसा उमटविला होता. बुधवारी सायंकाळी शिदे-फडवणीस सरकारकडूंन दुसऱ्या टप्प्यामधील जवळपास २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यांत आल्या. यामध्ये औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या जागी असतिक कुमार पांडे औरंगाबाद जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार देण्यांत आला. शुक्रवारी दुपारी असतिक कुमार पांडे यांनी औरंगाबाद जिल्हाधिकारी पदाचा सुनील चव्हाण यांच्याकडूंन पदभार स्वीकारला. यावेळी अस्तिक कुमार पांडे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयांमधील सर्व आधिकार्यांच्या उपस्थिंतीमध्ये त्यांचे स्वागत करण्यांत आले.