दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी -कवि सरकार इंगळी
कोल्हापूर शाहू नगरीत छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी पन्हाळगड येथे काल आपल्या उज्जैनकर फाउंडेशन कोल्हापूर जिल्हा समन्वय समितीची बैठक साहित्य संमेलन स्थळ म्हणजे संजीवन नॉलेज सिटी पन्हाळा येथे संपन्न झाली. प्रा. एन. आर. भोसलेसर उपस्थित नसतानाही तेथील साळुंखेसर यांनी सर्वांना परिसराची संपूर्ण माहिती दिली. तसेच स्वादिष्ट भोजन दिले. त्यानंतर सर्व समन्वयक सदस्यांची सभा संपन्न झाली. यामध्ये विविध कार्यक्रमाची जबाबदारी प्रत्येक कमिटीकडे देण्यात आली. यामध्ये डॉ. श्रीकांत पाटीलसर व अजयकुमार वंगेसर यांनी मोमेंतो तयार करणे, फेटे घेणे ही जबाबदारी पूर्ण केलेली आहे. फेटे बांधण्यासाठी आंबीसरांनी दोन व्यक्तींना घेऊन येणे. रांगोळी, पालखी सजवणे यांची जबाबदारी लाटणे मॅडम, महाजन मॅडम, जमादार मॅडम, तेली मॅडम, पालखी, भजनी मंडळ ठरवणे पंकज शिर्के मॅडम, सचिन चौगले सर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. स्टेज व्यवस्था अजयकुमार वंगेसर, तानाजी आसबेसर, भिवाजी कांबळेसर यांच्याकडे आहे. पाहुण्यांचे स्वागत डॉक्टर श्रीकांत पाटीलसर, संदीप व्हनाळेसर, प्रवीण सूर्यवंशीसर यांच्याकडे आहे. निवासाची सोय पुरुष मंडळी अजयकुमार वंगेसर, मनोहर भोसलेसर, दिपक तोडकरसर आणि महिलावर्ग यांची जबाबदारी आपल्या भगिनी मंडळ यांनी घ्यायची आहे. भोजन व्यवस्था आपटेसर, कोकाटेसर व कदम सर यांनी घ्यावयाची आहे.
मुख्याध्यापक पी. एस. पाटीलसर,मुख्याध्यापक रणदिवेसर, मुख्याध्यापक श्रीकांत पाटीलसर, मुख्याध्यापक एच. वाय. शिंदेसर यांनी वातावरण निर्मिती आणि दिशादर्शक फलक करणे ही जबाबदारी घेणे.
एम. डी. रावणसर, डॉ. मा. ग. गुरवसर यांनी संपूर्ण देखरेख करावयाची आहे. कवि सरकार इंगळी, यांनी साहित्य संमेलन विशेषांक प्रकाशित करणेची जबाबदारी देणेत आली आहे.