दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- सामान्य प्रशासन विभाग जि.प.अमरावती येथे परीचर पदावर कार्यरत सुदाम वानखडे यांनी रविवारी सुटीच्या दिवशी येऊन सामान्य प्रशासन विभाग येथिल सर्व चेंबर ,परीसर,फर्निचर ईत्यादी यासोबतच सिंलिंग फँन स्वतः सिडी आणून सुद्धा स्वयंस्फुर्तीने स्वच्छ व साफ-सफाई करुन स्वच्छता अभियानात कर्तव्यदक्षतेची जीवंत मिसाल कायम केली.
त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरावरुन कौतुक होत असुन त्यांचे असे हे कार्य कर्मचाऱ्यांसोबतच नागरीकांना सुद्धा प्रेरणादायी ठरावे असेच आहे.
सुदाम वानखडे हे माजी सैनिक असुन सामाजिक प्रशासन विभाग जि.प.अमरावती येथे परिचर पदावर कार्यरत आहेत.काम करीत असतांना ते नेहमीच अतिशय संयमी,मितभाषी व कर्तव्यदक्ष असतात.वेळेवर कार्यालयात येणे व आल्या बरोबरच वेळ न दडवता कामास लागणे हा त्यांचा नित्य नियमचं.त्याचसोबतच सर्व कर्मचारी,वरीष्ठाशी सौजन्यपुर्ण वागणुक देणे या त्यांचे वागणुकीमुळे ते सर्वांना सुपरीचित आहेत.
जसे ते कर्तव्य दक्ष आहेत त्याचप्रमाणे ते अतिशय सुंदर बासरी वादक सुद्धा आहेत.आपल्या बासरीतुन मधुर स्वर तरंग काढुन सर्वांनाच मंत्रमुग्ध करतात.
सुदाम वानखडे यांचे असे प्रेरणादायी कार्य सर्वश्रुत प्रेरणास्रोत घेण्यासारखे असुन त्यांचे कर्तव्यदक्ष व निस्वार्थी कार्यास सलाम…!