दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी- शहाबाज मुजावर.
पन्हाळा गिरीस्थान नगर परिषद महिला व बालविकास विभाग मार्फत विविध योजना राबवल्या जातात. यामधील बालविकास घटका अंतर्गत पन्हाळा शहरातील दोन अंगणवाड्यांना महिला व बाल विकास 5% राखीव निधी अंतर्गत विविध साहित्याचे वाटप केले. या साहित्यामध्ये विविध प्रकारची आणि शालेय उपयोगी साहित्य, तिजोरी, वजन काटे, बोर्ड, स्टेशनरी इत्यादी साहित्याचा समावेश आहे.
पन्हाळा शहरातील शासकीय अंगणवाडी मधील लहान मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे या हेतूने नगरपरिषदेच्या राखीव निधीतून सदर साहित्य वाटप करत असल्याचे विद्या कदम,प्रशासक तथा मुख्याधिकारी पन्हाळा नगरपरिषद यांनी सांगितले. सदर निधीतून 18 ते 45 वयोगटा महिलांना चार चाकी वाहन प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.
तसेच आज रोजी पन्हाळा नगर परिषदेच्या दिव्यांग साठी राखीव पाच टक्के राखीव निधी मधून एकूण 27 पात्र दिव्यांग लाभार्थी यांच्या बँक खाते वर 18,889/- प्रत्येकी प्रमाणे निधी वर्ग करण्यात आला.
याप्रसंगी श्रीमती विद्या कदम,प्रशासक तथा मुख्याधिकारी, रूपाली धडेल,माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक रवींद्र तोरसे, माजी नगरसेविका तेजस्विनी गुरव, वकील जी. जी नानिवडेकर,प्रशासकीय अधिकारी अमित माने, अभियंता मुकुल चव्हाण व नगरपरिषद कर्मचारी वर्ग उपस्थित होते.