दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे माजी सचिव कै. शंकरराव लक्ष्मणराव तोटावार व कै. अरुण लक्ष्मणराव तोटावार देगलूर यांच्या स्मरणार्थ मोफत तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आयोजित मोफत नेत्र चिकित्सा शिबिरात रुग्णांची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत ओषधी चष्मे देण्यात आले. सौ. योगेश्वरी मनोज तोटावार नगरसेविका प्रभाग क्र. 5 यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच 16 ऑक्टो. रविवार रोजी देगलूर येथील सरस्वती शाळेत भव्य नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात अडीचशेहून अधिक लोकांनी नाव नोंदणी केली होती. यामध्ये गोरगरिब वृद्धकरण्यात आल होत. या शिबिरात अडीचशेहून अधिक लोकांनी नाव नोंदणी केली होती. यामध्ये गोरगरिब वृद्ध स्त्री-पुरुषांचा अधिक सहभाग दिसून आला.
यावेळी अनेक रुग्णांनी डोळ्यांच्या समस्या व्यक्त केल्या. डोळ्यांवर ताण पडल्याने डोके दुखते. फळयावरील छोटी अक्षरे मुलांना वाचता न येणे. फळा किंवा टी. व्ही., इ. दूरच्या वस्तूंकडे बघताना डोळे बारीक करणे. वाचताना पुस्तक तोंडाजवळ धरणे. जवळचे किंवा लांबचे नीट न दिसणे. डोळ्यातून पाणी गळणे, जास्त तास वाचन केल्यास डोळयांवर ताण पडणे. तिरळेपणा दिसणे. डोळे किंवा डोकेदुखी. याची तपासणी करून दृष्टीदोषाच्या प्रकाराप्रमाणे योग्य चष्मा दिला.सौ. योगेश्वरी मनोज तोटावार नगरसेविका प्रभाग क्र. 5 यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच 16 ऑक्टो. रविवार रोजी देगलूर येथील सरस्वती शाळेत भव्य नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात अडीचशेहून अधिक लोकांनी नाव नोंदणी केली होती. यामध्ये गोरगरिब वृद्ध स्त्री-पुरुषांचा अधिक सहभाग दिसून आला.
यावेळी अनेक रुग्णांनी डोळ्यांच्या समस्या व्यक्त केल्या. डोळ्यांवर ताण पडल्याने डोके दुखते. फळयावरील छोटी अक्षरे मुलांना वाचता न येणे. फळा किंवा टी. व्ही., इ. दूरच्या वस्तूंकडे बघताना डोळे बारीक करणे. वाचतानापुस्तक तोंडाजवळ धरणे. जवळचे किंवा लांबचे नीट न
दिसणे. डोळ्यातून पाणी गळणे, जास्त तास वाचन केल्यास डोळयांवर ताण पडणे. तिरळेपणा दिसणे. डोळे किंवा डोकेदुखी. याची तपासणी करून दृष्टीदोषाच्या प्रकाराप्रमाणे योग्य चष्मा दिला.
दिवसभर पार पडलेल्या शिबिरात सुमारे पाचशे ते सहाशे नेत्र रुग्णांनी लाभ घेतला यामध्ये नेत्र रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले. 498 लोकांना ड्रॉप वाटप झाले. तर मोतीबिंदू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी येण्यास सांगितले. आली. यावेळी उदयगिरी हॉस्पिटल चे डॉ. रवि काळे, यावेळी देगलूर येथील नेत्र तज्ञ डॉ. श्याम कळसकर, हाडाचेशेख मेहमूद, अरुण तोटावार, रविंद्र तोटावार, व्यंकट पुरमवार, प्रा. सिकंदर देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेशअप्पा गंदिगुडे, एकनाथ टेकाळे, सोहेल चाऊस, श्रीहरी दीवार, माधव संगमकर, देवीदास कोंडलाडे, संजय येशमवार, बळीराम तोटावार, यासह आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. या भागातील नागरिकांनी माजी नगरसेविका सौ. योगेश्वरी तोटावार व श्री मनोज तोटावार या दापत्याचे आभार मानले. यांच्या या जनसेवेबद्दल आशिर्वाद व्यक्त केल्या. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.