दैनिक चालू वार्ता लोहा प्रतिनिधी— राम कराळे . . . . . . 18/10/2022 रोजी धावरी, ता.लोहा शिवारात बालाघाट साखर कारखाना,सांगवी चे ऊस तोडीचे मजूर हे सुधाकर किशन पवार यांचे शेतात ऊस तोडी करत असताना वेळ 15:30 वा. चे सुमारास विजेच्या कडकडाटात पाऊस सुरू झाल्यामुळे ऊसतोड करणारे 02 पुरुष व 02 महिला कामगार हे शेतातील लिंबाचे झाडाच्या खाली उभे टाकलेले असताना सदर लिंबाचे झाडावर वीज पडून त्यात 1) माधव पिराजी डुबूकवाड, वय 40 वर्ष, रा. पानभोसी, ता.कंधार. 2) पोचीराम शामराव गायकवाड,वय 50 वर्ष, रा.पेठ पिंपळगाव, ता.पालम. 3) रूपाली पोचीराम गायकवाड, वय 16 वर्ष, रा.पेठ पिंपळगाव, ता.पालम हे वीज पडून मयत झाले आहेत.
तसेच 4) पूजा माधव डुबुकवाड, वय 16 वर्ष, रा.पानभोसी, ता.कंधार ही मुलगी जखमी झाल्यामुळे तीस उपचार कामी स.द नांदेड येथे रेफर करण्यात आलेले आहे, तिन्ही मृतदेह सरकारी दवाखाना लोहा येथे पोस्टमार्टम कामी घेऊन आलेले आहेत. तरी अ मृ दाखल करून पुढील कारवाई करीत आहेत.