दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कोरेगांव-संभाजी गोसावी
ता. मौंजे सोनके ग्रामदैवत श्री.भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेस शनिवारपासून प्रारंभ होत असून सोनके ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन. वार. शनिवार दिनांक २२/१०/२०२२ रोजी रात्री९ वाजता श्री.ची मिरवणूक व हरिजागर यात्रेच्या मुख्य दिवशी वार. रविवार दिनांक २४/१०/२०२२ रोजी दुपारी १ वा.०५ मि. भैरवनाथ जोगेश्वरी लग्न सोहळा. तसेच रात्री ९ वाजता श्री.ची मिरवणूक (छबिना) वार .सोमवार दिनांक २४/१०/२०२२ रोजी सकाळी १० ते सायं ४ महाराष्ट्र पुरस्कार वैभवशाली मराठी लोकनाट्य मंगला बनसोडे सोबत नितीन करवडीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी नामवंत कुस्त्यांचा कार्यक्रम होईल. सायं रात्री ९ ते १२ मंगला बनसोडे यांचा कार्यक्रम होईल. वार. बुधवार दिनांक २६/१०/२०२२ रोजी रात्री ९.३० वा सुभाष हिंलगे निर्मिंत वैभव डान्स म्युझिकल नाईट (ऑर्केस्ट्रा) नाटिका: कशी ओवाळू भाऊ राया तुला, वार.गुरुवार दिनांक २७/१०/२०२२ रोजी रात्री ९ वा. लावणी सम्राज्ञी चैताली राजे पुणेकर यांचा नव्या जुन्या लावण्यांचा कार्यक्रम होईल अशा धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सोनके ग्रामस्थ यात्रा कमिटीच्या वतीने करण्यांत आले आहे.