दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर: आज दिनांक 25 /10 /2022 रोजी देगलूर येथील पोलीस स्टेशन चे पी आय श्री सोहम माच्छरे सरांच्या हस्ते दैनिक चालू वार्ता पेपरचे द्वितीय दिवाळी अंक प्रसारित करण्यात आला त्यावेळी देगलूर पोलीस स्टेशनचे पी आय श्री सोहम माच्छरे सरांनी दैनिक चालू आता पेपरच्या पुढील कार्यसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या सर पुढे म्हणाले की दैनिक चालू वार्ता पेपर मागील काळामध्ये पत्रकारिता करत करत सामाजिक कार्यामध्ये खूप उल्लेखनीय काम केलेले आहे त्यांनी देगलूर शहरांमध्ये स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त देगलूर शहरातील व परिसरातील शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचे वाटप केले व तसेच विविध शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतले
पुढे म्हणाले पेपर मध्ये बातम्या टाकत टाकत असेच लोक हिताचे जर वेळोवेळी कार्य केले तर समाजामध्ये एक चांगला संदेश वर्तमानपत्राबद्दल जातो दैनिक चालू वार्ता पेपर प्रमाणे सर्व वृत्तपत्रांनी असे सामाजिक कार्य घेत जावे असे म्हणाले .