दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी -विशाल खुणे
दि 05 ऑक्टो औरंगाबाद
प्रा. अंकुश शिंदे यांनी लिहिलेल्या “आता मी यशस्वी होणार.!” या पुस्तकाचे प्रकाशन सतीश सूर्यवंशी सह संचालक आयटीआय मराठवाडा विभाग यांच्या शुभ हस्ते तसेच प्रा. आकाश सोळुंके यांच्या प्रमुख्य उपस्थित करण्यात आले.
विद्यालंकार क्लासेस औरंगाबाद येथे शुक्रवार दि. ०४/११/२०२२ रोजी सकाळी १० वा. सतीश सूर्यवंशी, प्रा. आकाश सोळुंके यांच्या खास उपस्थितीत सदरील कार्यक्रम संपन्न झाला. करिअर व स्पर्धा परीक्षा साठी उत्तम मार्गदर्शक, आपण कुठे व का कमी पडतो, रिझल्ट/मार्क्स येत नाहीत दोष कुणाचा, अभ्यास करतो पण लक्षात राहात नाही, आज पर्यंत झालेल्या व भविष्यात होणा-या चुका कोणत्या, यश म्हणजे काय, योग्य वेळी योग्य निर्णय कसे घ्यावे, आहे त्या परीस्थितीत यश कसे मिळवावे, अशा अनेक प्रश्नाची उत्तरे या पुस्तकातून मिळणार आहेत. त्यामुळे ध्येय निश्चित करणा-या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी सतीश सूर्यवंशी, प्रा. आकाश सोळुंके, सदरील पुस्तकाचे लेखक प्रा. अंकुश शिंदे, सुहास सर व शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.