दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनीधी -प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड शहरामध्ये विविध धर्माच्या अनेक जातीतील विविध वेशभूषा , केशभूषा व भाषा रचना असलेल्या लोकांचा जनसमूह / लोक अतिशय गुण्यागोविंदाने नांदत असलेला आज दिसून येतात. हे नांदेड शहर श्री गुरुगोविंद सिंग जी यांच्या पदस्पर्षाने पावन झालेली भूमी व नगरी म्हणून ओळखली जाते याच महानगरात उत्तर नांदेड मध्ये आज एक प्रामाणिकपणाचा जिवंत अनुभव सर्व जनतेस पाहावयास मिळाला.
नांदेड शहरात श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर , नवीन कौठा नांदेड मध्ये इयत्ता बारावी वर्गात शिकत असलेली कुमारी पतंगे अंकिता पुंजाजी ही विद्यार्थिनी राज कॉर्नर लगत असलेले आर. आर. वॉच सेंटर नांदेड येथे काही खरेदी करण्यासाठी गेली असता कु.अंकीता पतंगे ची त्या ठिकाणी काही रक्कम असलेली पैशाची पर्स विसरली परंतु ही बाब तिच्या लक्षात राहिली नाही ती संपूर्ण कॉलेज परिसरात शोधत फिरत होती परंतु अचानक दोन दिवसाच्या नंतर आर. आर. वॉच दुकानाचे मालक रहमत रहीम अब्दुल करीम यांनी कुमारी अंकिता पतंगे या विद्यार्थिनीस बोलावून घेऊन तसेच कॉलेजचे उपप्राचार्य परशुराम येसलवाड , पर्यवेक्षक माधव ब्याळे यांच्या त्या विद्यार्थिनीची पैशाची पर्स विसरून राहिली आहे ही बाब निदर्शनास आणून दिली त्यावेळेस कॉलेजच्या वतीने प्राचार्य परशुराम येसलवाड , पर्यवेक्षक माधव ब्याळे , ज्येष्ठ प्रा. वसंत राठोड , प्रा.लक्ष्मण आकणगीरे प्रा.अमर दहिवडे , प्रा.उमर शेख , प्रा.यानभुरे जयवंत , प्रा.मोरेश्वर निलेश , प्रा.कपील सोनकांबळे , दैनिक चालू वार्ता वृत्तपत्राचे उत्तर नांदेडचे प्रतिनिधी समर्थ दादाराव लोखंडे यांच्यासह आर.आर.वॉच सेंटरवर जाऊन दुकान मालक रहमत रहीम अब्दुल करीम यांच्यासह कुमारी अंकिता पुंजाजी पतंगे व कुमारी मानसी कमल कुमार भिसे या विद्यार्थिनीचा व दुकान मालकांचा कॉलेज प्रशासनाच्या वतीने त्यांच्या प्रामाणिकपणाचा विचार करून हृदय पूर्ण सत्कार करण्यात आला व त्यांचे अभिनंदन करण्यात आले.