दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी.. राम चिंतलवाड
12 जण गंभीर तर 5 गंभीर जखमींना नांदेड येथे रवाना करण्यात आले…
हिमायतनगर सरसम बुद्रुक येथे अंत्यविधी करून परत येत असणाऱ्या स्वर्ग रथाचा हिमायतनगर जवळील दारूम उलुम येथे भीषण अपघात झाला आहे. यात 12 जण जखमी झाले. यातील गंभीर रुग्णांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे…
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बुद्रुक येथे परसराम कांबळे यांच्या अंत्यविधी उरकून धानोरा चातारी खरूस उमरखेड येथील पाहुणे मंडळी हिमायतनगर कडे स्वर्ग रथाने येत असताना राष्ट्रीय महामार्गावरील खडकी पाट्या समोरील दारू उलुम येथे स्वर्ग रथामध्ये बिघाड झाल्यामुळे तो पलटी झाला. यात प्रवास करणारे 8 ज्येष्ठ महिला व 4 पुरुष हे जखमी झाले आहेत यामध्ये सुनंदा दिलीप कांबळे चातारी वय 40 दिलीप कांबळे चातारी मिराबाई पांडुरंग तुळशे धानोरा हिमायतनगर वय 55 पुनर्ता भारत साखरे गांजेगाव तालुका उमरखेड वय 57 गंगाराम संभाजी कांबळे खरुस तालुका उमरखेड वय 75 सुदाम बाळू वाठोरे राहणार खरूस तालुका उमरखेड वय 65 पांडुरंग दत्ता वाठोरे राहणार सिरंजनी तालुका हिमायतनगर व 67 वच्छलाबाई पांडुरंग वाठोरे राहणार सीरंजनी तालुका हिमायतनगर प्रयागबाई प्रल्हाद तुळशे राहणार धानोरा तालुका हिमायतनगर वय 60 वर्ष, शांताबाई दिगंबर तुळशे राहणार धानोरा तालुका हिमायतनगर वय 62 सगुना मधुकर तुळशे राहणार धानोरा वय 35 संगीताबाई उत्तम तुळसे राहणार धानोरा वय 46 हे जखमी झाले आहेत. या सर्व जखमी रुग्णांना हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.यातील 5 गंभीर जखमी रुग्णांना नांदेडला रवाना करण्यात आले आहे.यावेळी वैद्यकीय अधिकारी भुरके यांनी जखमी रुग्णांची तपासणी केली. यावेळी हिमायतनगर पोलीस स्टेशनचे हिमायतनगर ते बीट जमादार अशोक शिंगणवाड यांनी येऊन भेट दिली…
यावेळी जखमी रुग्णांच्या मदतीसाठी हिमायतनगर येथील भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी मुन्ना शिंदे बालाजी ढोणे योगेश चिल्कावार नागोराव शिंदे यांनी सहकार्य केले.