दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी : जब्बार मुलाणी
—————————————-
भिगवण -मदनवाडी
कुणी चांगले म्हणावे म्हणून काम करू नये, आपण करीत असलेल्या कामाने अनेकांचे भले होणार असल्यास ते काम सोडूच नये.
जर आपला हेतुच शुध्द आणि प्रामाणिक असेल तर… आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्व नसते.
चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात.
मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थापणे केलेले काम कधीही व्यर्थ जात नाहीत.
असेच डॉ.मृदुला जगताप ह्या एक महीला असून यांच ही कार्य अहोरात्र निस्वार्थ निस भावना कामाची एक निष्ठ राहून आरोग्य तपासणी शिबीर ऊसतोड कामगारांची शेताच्या बांधा वर जाऊन थंडीत देखील आरोग्य तपासणी करण्यात आली . यामध्ये त्यांचं मोठ अमुल्य अस योगदान आहे.
जिल्हा परिषद पुणे यांच्या संकल्पनेतून शेतमजुरांना बांधावर थंडी मध्ये देखील मिळाली आरोग्यसेवा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद सर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजयकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शेतमजुरांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली
उद्दिष्टे-उपजत मृत्यू अर्भक मृत्यू माता मृत्यू याचे प्रमाण कमी करणे
गरोदर माता अपेक्षित प्रसूती दिनांक व अपेक्षित प्रस्तुती ठिकाण यांचे योग्य नियोजन(रक्ताच्या विविध चाचण्या हिमोग्लोबिन रक्तगट एचआयव्ही रक्तातील साखर)
0ते 6 वयोगटातील बालकांची तपासणी तसेच संपूर्ण लसीकरण व औषध उपचार
तीस वर्षावरील नागरिकांची असंसर्गजन्य रोग तपासणी यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह कॅन्सर इत्यादी तपासणी
कुटुंब कल्याणकारी कार्यक्रम अंतर्गत शासकीय योजना याविषयी जनजागृती तसेच महिला व पुरुष यांना गर्भनिरोधक गोळ्या व निरोध यांच्या वाटप करण्यात आले तसेच स्त्री व पुरुष शस्त्रक्रिया विषयी सल्ला देण्यात आला
या शिबिरामध्ये एकूण 308 नागरिकांना लाभ मिळाला
यामध्ये पुरुष 131 महिला 104, 0 ते 6वयोगटातील बालके 39 ,7 ते 15 वयोगटातील 13 ,गरोदर माता 8 यांचा समावेश
गरोदर मातेसाठी मोफत सोनोग्राफी डॉ. अमोल खानावरे करणार आहेत
हे शिबिरासाठी नेहमीच गरजूंच्या आरोग्यासाठी मदतीचा हात विद्यानंद फाउंडेशन बारामती अध्यक्ष आनंद लोखंडे, बाळू आशा वर्कर अंगणवाडी सेविका तसेच
अहोरात्र कार्य करत आहेत
यात आला
तक्रारवाडी उपकेंद्राच्या डॉ. मृदुला जगताप यांच्या या उल्लेखनीय कामाची दखल खासदार सुप्रियाताई सुळे यांनी घेऊन पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे कौतुक केले.