दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
शहरातील जुना लोहा येथे लहुजी साळवे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, लहुजी साळवे यांच्या जयंतीच्या निमित्ताने लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लक्ष रुपये कामाचे जुना लोहा येथे उभारण्यात आलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभामंडपाच्या बांधकामाचे लोकार्पण काल सोमवारी लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिने अभिनेते तथा माजी सनदी अधिकारी अनिल मोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंतराव पवार, खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार, माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, माजी नगरसेवक पंकज परिहार, माजी नगरसेवक अनिल दाढेल, माजी नगरसेवक शरफोदिन शेख, पांडुरंग शेटे, सरपंच फय्याज शेख प्रमुख उपस्थित होते, यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व आशाताई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सभा मंडपाचे लोकार्पण आ. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, मतदारसंघातील मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी कटिबद्ध असून सभा मंडपामध्ये सर्व समाजाला अधिकच्या दर्जेदार सेवा सुविधा सहज उपलब्ध होण्यासाठी मी अजून अधिकचा निधी देणार असल्याचे आमदार शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले, यावेळी शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांनी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शामसुंदर शिंदे यांच्या विकासाभिमुख कार्यकर्तत्वाचा लेखाजोगा स्पष्ट केला, यावेळी उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांनी लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले, या कार्यक्रमाचे आयोजक पांडुरंग दाढेल, गजानन चव्हाण, भाऊराव कंधारे, चक्रधर डोके, सिद्धू पाटील वडजे, अनिकेत जोमेगावकर, बबन दाढेल, सतार शेख, सचिन शेटे, नारायण नागरगोजे, संदीप साळवे ,बालाजी जाधव सह बहुसंख्येने महिला व समाज बांधव उपस्थित होते.