दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
पटणा : DGP भारतीय पोलीस सेवा अधिकारी राजविंदर सिंग भाटी यांची बिहारचे नवे DGP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी, भट्टी हे सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) पूर्व कमांडचे एडीजी म्हणून कार्यरत होते.
ते सध्याचे डीजीपी एसके सिंघल यांची जागा घेतील, जे 19 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. DGP आरएस भट्टी हे बिहार केडरचे 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते मूळचे पंजाबचे आहेत. एक कणखर पोलीस अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी दोन वेळा सीबीआयमध्ये काम केले आहे. याशिवाय भाटी यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये मुख्य दक्षता अधिकारी म्हणूनही काम केले आहे. ते 2025 मध्ये निवृत्त होणार आहेत.