दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- राम पाटील क्षीरसागर
सरपंच पदाच्या उमेदवार सरस्वतीबाई गोविंद वाघमारे यांच्यासह ५ ग्राम पंचायत सदस्य पदाचे उमेदवार विजयी
सरपंच पदासाठी सर्वसाधारण जागेवर अनु.जाती.तील महिला उमेदवार विजयी
——————————- .
लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील २०२२ ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत ग्राम विकास परिवर्तन पॅनलने वर्चस्व प्रस्थापित करुन सरपंच पदाच्या उमेदवार सरस्वतीबाई गोविंद वाघमारे यांच्या सहीत ग्राम पंचायत सदस्य पदाचे ५ उमेदवार हे दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत.
लिंबोटी ग्राम पंचायती निवडणूक यंदा अत्यंत अतितटीची व तिरंगी लढत झाली.सरपंच पद हे सर्वसाधारण वर्गासाठी असुन देखील येथे अनु.जाती. (एससी) तील महिला उमेदवारांनी सरपंच पदासाठी दणदणीत विजय संपादन केला व त्यांच्या सोबतच त्यांच्या पॅनलचे ९पैकी पुढील ५ ग्राम पंचायत सदस्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत ते पुढीलप्रमाणे राजाबाई वैजेनाथ डोईफोडे, सत्यभामा सतीश कदम, गोदावरीबाई अंकुश गिते, रवि परसराम, शुध्दोधन उतम वाघमारे हे विजयी झाले आहेत.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच व ग्राम पंचायत सदस्यांचे अभिनंदन पॅनल प्रमुख अभिजित वाघमारे, पप्पू वाघमारे, माधव वाघमारे व सर्व मित्रमंडळी व गावकरी मंडळीने केले आहे.