दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल- माणिक सुर्यवंशी
दि.17/12/2022 रोजी नांदेड येथील साई्स काॅलेज मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत 400 मी.व 600 मी धावणे या दोन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे*
तरी दि.19/12/2022 रोजी
विद्या विकास विद्यालय शेवाळा.ता.देगलूर जि.नांदेड या शाळे तर्फे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी *सोमेश मारोती राजूरे* यांचं अभिनंदन व सत्कार करण्यात आला आहे तरी शेळगाव येथे युवा मंच तर्फे सोमेश मारुती राजुरे या विद्यार्थी व पालकांचा त्यांच्या राहत्या घरी शेळगाव येथे युवा मंच तर्फे सत्कार करण्यात आला आहे. या प्रसंगी राजू म्हेत्रे, मल्लेश बरगे, धम्मपाल कापसे, मलगोंडा पारसेवार, मारुती राजुरे, विठ्ठल म्हेत्रे इ. कार्यक्रते उपस्थित होते. सर्व स्तरावर त्याचे अभिनंदन होत आहे. खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.