
दैनिक चालू वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
नंदुरबार येथे महिला सुपोषण मेळावा घेण्यात आला.
यावेळी आदिवासी विकास संस्थेचे कार्यकारी संचालक रंजना कान्हेरे उपस्थित होते.
नंदुरबार तालुक्यातील पन्नास गावात कुपोषण थांबविण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून पोषण कृती गट स्थापन करण्यात आला होता ,त्या गटांमार्फत कुपोषित बालकांना शेंगदाण्याचे लाडू आणि चिवडा बनवून देत त्यांना कुपोषण विषयी जनजागृती करत होते.
अंगणवाडी सेवा व आरोग्य सेवा सुधारण्यासाठी गाव आरोग्य पाणीपुरवठा पोषण आहार समिती नियमितपणे गावातील आरोग्याच्या व अंगणवाडीच्या सेवांवर लक्ष ठेवून होते.
तसेच गावातील किशोरी गट व महिला गटांच्या सातत्याने बैठक होत होत्या.
त्या अनुषंगाने वेगवेगळ्या गावातील आलेल्या महिलांनी खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले होते. पदार्थ फक्त स्टॉल लावले नसून त्या पदार्थांचे मधून आपणास कोणकोणते पोषण तत्वे मिळतात हे देखील महिलांकडून सांगण्यात आले.
नंतर आलेले महिलांनी कुपोषणावर काम करताना आलेले अनुभव मानले.
जनार्थ संस्थचे रंजना कान्हेरे यांनी महिलांना कुपोषण विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास पन्नास गावातून महिलांनी उपस्थिती नोंदवली.