दैनिक चालु वार्ता कौठा प्रतिनिधी- प्रभाकर पांडे
कंधार :- लिंगायत समाजाच्या विविध मागण्या संदर्भात लिंगायत समय समिती समन्वये समिती व सकल लिंगायत समाजाच्या वतीने ता. २९ जानेवारी रोजी मुंबई येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे तरी कंधार लोहा तालुक्यातील जास्तीत जास्त बसव भक्तांनी सहभाग नोंदणीचा अहवाल बसव ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अविनाश भोसीकर यांनी कंधार येथे बोलताना केले.
मुंबई येथे तारीख २९ जानेवारी रोजी अखिल भारतीय लिंगायत समय समिती व बसव ब्रिगेडच्या वतीने भव्य विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चात लिंगायत समाजाला संविधानिक मान्यता द्या. राज्यातील लिंगायत समाजाला अल्पसंख्यांकाचा दर्जा जाहीर करा. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा. विधान भवन परिसरात महात्मा बसवेश्वराचा अश्वारूढ पुतळा उभा करा. अशा विविध मागण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यात महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा सह इतर राज्यातून लाखो समुदाय या मोर्चात सामील होणार आहे. तरी कंधार व लोहा तालुक्यातील हजारो लिंगायत समाज कार्यकर्त्यांनी सामील होण्याचे आवाहन अविनाश भोसीकर यांनी केले आहे. यावेळी डॉ.वेंकट कुराडे,दत्ता भाऊ कारामुंगे,वंचित जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले, पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे, सचिन पाटील पेटकर मुंजाजी किडे, शुभम मरर्शिवणे,नितीन चीचोलिंकर,एकनाथ विश्वासराव, शुभम फस्मले,अक्षय किडे, अजिंक्य पांडागळे यांची उपस्थिती होती.