दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : नांदेडहून मुंबईसाठी जाणाऱ्या प्रवाशांची निकड लक्षात घेऊन आणखी एक विशेष रेल्वे गाडी सोडली जाणार आहे. ही गाडी जरी नांदेडहून अकोला मार्गे जाणार असली तरीही या गाडीचा फायदा परभणी जिल्ह्यातील नागरिकांनाही दिलासाजनक ठरला जाईल असे दिसून येतेय.
दक्षिण मध्य रेल्वेने घेतलेला हा निर्णय दूरगामी विचारांचा असल्याचे जाणवतेय. प्रारंभी सोडली जाणारी ही द्वी-साप्ताहिक रेल्वे प्रवाशांचा वाढता प्रतिसाद बघून कालांतराने भविष्यात ती साप्ताहिक तथा प्रतिदिन सुध्दा चालविली जाऊ शकेल. प्रवाशांची सोय आणि वाढता प्रतिसाद पर्यायाने आर्थिक फायदा लक्षात घेऊन या रेल्वेच्या फेऱ्या वाढवताना त्या मार्गावर अन्य वाहतुकीलाही अडथळा ठरला जाणार नाही, याची सुध्दा व्यवस्थापनाला काळजी घेणे गरजेचे ठरणार आहे.
नांदेडहून मुंबईसाठी विशेष सेवा म्हणून सोडली जाणारी ही गाडी पूर्णा,वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला या मार्गाने थेट कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जाणार आहे. आठवड्यातून दोनदा म्हणजेच सोमवार आणि बुधवार नांदेड येथून तर मंगळवार आणि गुरुवार कुर्ला येथून ही सेवा उपलब्ध राहाणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील चाळीसगाव पर्यंतच्या कोणत्याही स्थानकादरम्यानचा प्रवास करणे परभणी जिल्ह्यातील प्रवाशांना सोयीचे ठरु शकेल शिवाय नांदेडहून परभणी मार्गे मुंबईला जाणाऱ्या अन्य नियोजित रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे बऱ्याचदा दूरापास्त ठरले जाते, अशावेळी एक पर्याय म्हणून यनव्याने सुरू होणाऱ्या कुर्ला गाडीचा किमान कल्याण पर्यंत तरी उपयोग होऊ शकतो, हे नाकारून चालणार नाही. पुढे मुंबई पर्यंतचा प्रवास कल्याण येथून लोकलने करता येऊ शकतो.
सोमवार, दि. ३० जानेवारी, ६, १३, २० आणि २७ फेब्रुवारी २३ रोजी नांदेडहून मुंबई-कुर्ला येथील टिळक टर्मिनससाठी सोडली जाणारी ही विशेष गाडी ०७४२६ क्रमांकाची असून ती रात्रौ २१.१५ वाजता निघेल. ती पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भूसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपूरी, कल्याण ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे मंगळवारी दुपारी १३.३० वा. पोहोचेल तर मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून नांदेडसाठी मंगळवार, दि. ३१ जानेवारी, ७, १४, २१ आणि २८ फेब्रुवारी २३ रोजी दुपारी १६.४० वा. सोडली जाईल. ०७४२७ क्रमांकाची ही गाडी कल्याण, इगतपूरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली, वसमत, पूर्णा मार्गे नांदेड ला बुधवारी सकाळी ०९.३० वा. पोहचली जाईल.
दर बुधवारी नांदेड येथून रात्री २१.१५ वा. लोकमान्य टिळक टर्मिनस साठी सोडली जाणारी ०७४२८ क्रमांकाची गाडी दि.२५ जानेवारी आणि १, ८, १५ आणि २२ फेब्रुवारी २०२३ या दिवशी असेल. या गाडीचे मार्गक्रमण ठरल्याप्रमाणे तसेच राहील. पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भूसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण मार्गे. मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथे गुरुवारी दुपारी १३.३० वा. पोहोचेल तर गाडी क्र.०७४२९ ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून नांदेडसाठी गुरुवार दि.२६ जानेवारी आणि २,९,१६ आणि २३ फेब्रुवारी २०२३ रोजी १६.५५ वा. सुटून ती शुक्रवारी सकाळी ०९ वा पोहोचेल.
या गाडीचे मार्गक्रमण कल्याण, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली, वसमत, पूर्णा मार्गे नांदेड असे राहिले. या दोन्ही गाड्यांमध्ये वातानुकूलित डब्बे आणि स्लीपर कोच राहातील. एकूणच नव्याने सुरू केली जाणारी ही विशेष रेल्वे सेवा परभणी जिल्हा वासियांना दिलासादायक अशीच म्हणावी लागेल.