दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :- अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कारला फाट्यावर दोन युवक एमडी ड्रग्स घेवून येत असल्याची गुप्त माहिती अमरावती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वी सापळा रचून दोन युवकांपासून काल दुपारी चार वाजताच्या दरम्यान एमडी ड्रग्स जप्त केले असून दोन युवकांना ताब्यात घेण्यात आले असून याची माहिती आज मंगळवार दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता पोलीस स्टेशन येथून मिळाली.मेफेड्रॉन अर्थात एमडी या अमली पदार्थांची तस्करी करून तालुक्यात येत असलेल्या दोन युवकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयाच्या आधारे ताब्यात घेतले त्यांची झाडा झडती घेतली असता त्यांच्याकडून एका गिप्ट पॅकिंगमध्ये एमडी ड्रग्स असल्याचे पोलिसांना लक्षात आले.जप्त केलेल्या ड्रग्सचे वजन ५७ ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत १ लाख ७१ हजार रुपये असल्याची माहिती मिळाली आहे काल रात्री पर्यंत अंजनगाव पोलीस स्टेशन येथे ग्रामीण पोलीसांची सुरु होती याप्रकरणी पोलिसांनी अकोला येथील २२ वर्ष व बुलढाणा जिल्ह्यातील २१ वर्ष अशा दोन युवकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरु केली आहे.दरम्यान हे अमली पदार्थ त्यांनी कोठून आणले,कोठे व कोणाला देणार होते याबाबत पोलीस कसून चौकशी करीत आहे.एमडी हे अतिशय महागडे अमली पदार्थ आहे.अंजनगाव परिसराच्या हद्दीत ही पहिलीच कारवाई आहे.याबाबत अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन येथे कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.