दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे…
मंठा.. स्वामी विवेकानंद विद्यालय मंठा येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साह मध्ये साजरा करण्यात आला ध्वजारोहण विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बी.आर. ताठे सर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक श्री आर. डी. ठोकरे सर ,पर्यवेक्षक श्री एस .एन. मोरे सर श्री रमेश राव ढवळे सर तसेच निवृत्त मुख्याध्यापक श्री अंकुशराव मोरे तसेच मंठा येथील पत्रकार व प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.
यावेळी देशभक्तीपर गीते तसेच महाराष्ट्राची परंपरा असलेली लेझीम नृत्य तसेच भांगडा नृत्य आणि देशभक्तीपर गीतां गीतांवर नृत्य द्रोपदाबाई आकात पूर्व प्राथमिक शाळा, स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालय विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सादर केले यावेळी सूत्रसंचालन श्री पी पी चव्हाण सर यांनी केले याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक श्री ताठे सर यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्ग अध्यापनाबरोबरच अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची गरज असते याबद्दलच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि भविष्यामध्ये ही विद्यार्थी आपल्या स्वतःचे कार्यकर्तुत्वावर यशस्वी होतात
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या तिन्ही विभागाच्या शिक्षकांनी भरपूर मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले