दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा – संत शिरोमणी जगद्गुरु रविदास महाराज यांची जयंती लोहा शहरात सामाजिक उपक्रमांचे आयोजन करुन साजरी करण्यात आली.
लोहा शहरातील गुरू रविदास मतीमंद विद्यालय व संभाजी मतिमंद विद्यालयात गुरू रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला तसेच लोहा येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.
यावेळी युवा सेनेचे बालाजी गाडेकर युवा नेते प्रसाद देशमाने,सोमाश खरात,ग्रामसेवक मारोती कांबळे,अदीनाथ पौळ,जुनेद सयद खंडु जाधव,अमर भालके,ओम सरोदे,केशव डांगरे,आर्जुन हरगावकर, सोनु बनसोडे आदिंची उपस्थिती होती.