दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -मानिक सुर्यवंशी.
चैनपूर येथे अखंड हरिनाम सप्ताह चा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाच्या सेवेच्या निमित्त शहापूर ते पंढरपूर पायी दिंडी येत आहे.त्यानिमित्त चैनपूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे असून या पायी दिंडीचे स्वागत करण्यासाठी मतदार संघाचे लाडके आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्याप्रसंगी वारकरी संप्रदायाच्या वतीने आमदार जितेश अंतापुरकर यांचा येथे वारकरी पद्धतीने सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी आमदार महोदयांनी अतिशय भक्तीमय वातावरणामध्ये गळ्यामध्ये विना घालून टाळगजरामध्ये पायी दिंडीच्या वारीचे स्वागत केले शहापूर येथे पायी चालून त्यांनी दींडीचा आनंद घेतला.
अडचणीमध्ये मदत करण्याचे आश्वासन दिले त्याप्रसंगी चैनपूर येथील सर्व वारकरी संप्रदाय उपस्थित होते व त्यांनी साहेबांचे व येणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. पायी दिंडीच्या आगमनाच्या वेळी आमदार महोदयांनी स्वागत केले त्यांच्यासमवेत कोडगिरी साहेब ग्रेडर शहापूर,बसवराज पाटील वन्नाळीकर जि.प.स्विकृत सदस्य, शिवकुमार ताडकोले ग्रामसेवक संघटना जिल्हा उपाध्यक्ष, मारोतीराव हनेगावे गण प्रमुख कांग्रेस, प्रदीप वाघमारे सरपंच चैनपुर,कपिल देशमुख, हरीनाम सप्ताह कमिटी अध्यक्ष लालूप्रसाद बोरवाड उपाध्यक्ष संजय कोमुलवार,सचिव राजू ईबितदार, सुभाष मदनुरे, गंगाराम ईबितदार, बबन गवलवाड,गावातील असंख्य भाविक भक्त उपस्थित होते यावेळी अनेक सामाजिक उपक्रम या निमित्ताने राबविण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता मोहीम,अंधश्रद्धा निर्मूलन, अनेक विषयी राबविण्यात आले.या वेळी गावकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.या हरीनाम सप्ताहाचे पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन हरीनाम सप्ताह कमीटिच्या वतीने करण्यात आले.