दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -मानिक सुर्यवंशी
देगलूर तालुक्यातील शिवशंकर माध्यमिक विद्यालय वन्नाळी येथील विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी उत्सव 2023 मारताळा येथे झालेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत सहभाग घेऊन पाचवा क्रमांकाने यशस्वी झाला.”खंडेराया माझी झाली दैना रे” या गीतावर श्रद्धा लोखंडे पुनम हिप्परगे,भक्ती हिप्परगे,वर्तीका भाले,अंकिता मंगरूळे,प्रतीक्षा हिवराळे,आकांक्षा मठवाले,सोनाली इंगळे,श्रावणी दिवटे व त्रिशीला काळे या विद्यार्थिनींनी अप्रतिम अशी नृत्याविष्कार सादर करून उपस्थित त्यांची वाहवा मिळवली.या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आपले पाचवे स्थान पक्के करून रोख रक्कम,प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह मिळवत मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश वनंजे सर, विठ्ठल वाघमारे,माधव कदम,राजेश बामणे,धनाजी पा.मोरे,दिमलवाड आनंद,दिगंबर खिसे,बालाजी पेटेकर बालाजी बारडवार,सौ अंजली देशमुख, दिलीप पाटील,अंकमवार मामा आदींनी अभिनंदन केले या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून कलाध्यापक,बालाजी पेटेकर व सौ.देशमुख मॅडम यांचे विशेष योगदान लाभले.त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षा होत आहे.