दैनिक चालु वार्ता रायगड / म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा मेंदडी – महाराष्ट्र यांच्या कडून महिला सक्षमीकरण व सबलीकरण या साठी गावो गावी कार्यलय, शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी पथ नाट्याद्वारे जनजागरण करण्यात येत आहे याचे अवचित्य साधून म्हसळा तालुक्यातही अरुणोदय सुशिक्षित बेरोजगार संस्था खरसई च्या वतीने कला व वाणिज्य उच्चमाध्यमिक विद्यालय मेंदडी ( कोंड ) येथे ” महिला सक्षमीकरण ” हे पथ नाटय सादर करण्यात आले या वेळी कॉलेजचे प्रा. वैभव नाकती, प्रा. अंगद कांबळे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पथ नाटयाचे स्टार प्रचारक किशोर शिताळे, बासरी वादक कु. निहार धुमाळ, आर्यन येलवे, दिव्या पाटील, शिवानी वर्मा, हिताली म्हात्रे, स्नेहा खोत, धनश्री मेंदाडकर, प्रसिक वर्मा, प्रतीक कांबळे, वैभव, कांबळे यांनी खूप चांगल्या प्रकारे पथ नाटय सादरीकरण केले व समाजातील स्त्रीचे स्थान व स्त्रियांवर होणारे अन्याय मार्मिक भाष्य करणारे सादरीकरण होते