दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी – श्री, रमेश राठोड
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आर्णी तालुक्यातील येत असलेल्या चिकणी येथील गणपतराव गावंडे पाटील आश्रम शाळचे अध्यक्ष तथा आयकर विभागाच्या मोठ्या पदावरून यशस्वी रीत्या आपले कर्तव्य बजावणारे सेवा निवृत्त झालेले व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासणारे पुरुषोत्तम गावंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृध्दाश्रमात शिक्षकांचया वतीने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले.
हा कार्यक्रम आर्णी येथील स्व.सुशिलाबाई नागपुरे येथे दिनांक 1/2/2023 ला आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमात वृध्दाश्रमात एक हजार लिटरच्या दोन पाण्याचा टाक्या भेट दिल्या यावेळी येथील निराश्रित मुलांना कपडे व वृध्दांना फळे देउन मिष्टान्नाचे भोजन देऊन त्यांचा शाल श्रीफळ देउन सत्कार करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमात यादवराव ठाकरे सर अध्यक्ष लाभले त्यांनी गावंडे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. ते किसान ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष असुन शेतकर्यांच्या प्रशनांना न्याय देण्यासाठी नेहमी अग्रेसर असल्याचे सांगितले. तर गावंडे साहेबांनी ग्रामिण भागातून शिक्षण घेऊन उच्च पदावर गेलेत तेथे कर्तव्यदक्ष राहिलेत सोबतच सामाजिक बांधिलकी, कौटुंबिक जबाबदाऱ्या संभाळून ग्रामीण भागातील मातीशी नातं जपुन गावाकडील वाट कधी सोडली नसलयाने त्यांना शेतकरी व गावाकडील प्रश्नांची जाण आहे असे मत प्रेस क्लबचे अध्यक्ष विनोद सोयाम यांनी सुध्दा यावेळी व्यक्त केले .
यावेळी पुरुषोत्तम गावंडे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हटले की आयोजकांनी हा वाढदिवसाचा आयोजित करून माझ्यावरचे प्रेम तर व्यक्त केलेच आणि हा कार्यक्रम वृध्दाश्रमात आयोजित करून त्यांना मिष्टान्न व भेट वस्तू देउन त्यांच्यावरचेही प्रेम व्यक्त केले. त्यामुळे हा दुधात साखर असुन दुग्धशर्करा योग असल्याचे सांगून आयोजकांचे आभार व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जी. प. सदस्य अनंता भाउ गावंडे पाटील, संस्थेचे सचिव प्रशांत गावंडे पाटील , डॉ.शाम गुटे,शंकर दाभाडकर, राजु चौधरी,राम गावंडे पाटील ,प्रेस क्लबचे अध्यक्ष विनोद सोयाम
व सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी प्रास्ताविक व संचलन रावते मॅडम यांनी केले.