दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
पंतप्रधान आवास योजना: ८ हजार लाभार्थ्यांकडून वसूल होणार रक्कम
देगलूर: नांदेड जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत • घरकुल बांधकामासाठी पहिला हप्ता उचलूनही बांधकाम न करणाऱ्या ८ हजार २३५ लाभार्थ्यांना प्रशासनाने आता नोटिसा पाठविल्या आहेत.
किती खालील प्रमाणे लाभार्थ्यांना पाठविली नोटीस?
गोरगरीब नागरिकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात मागील पाच वर्षां मध्ये लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी पहिला हप्ता वितरित करण्यात आला. या लाभार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार घरकुल मंजूर करून घरकुल बांधकामासाठी ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून पहिला हप्ता देण्यात आला होता. पाच टप्प्यांमध्ये घरकुल बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित असते. पहिला हप्ता मिळाल्यानंतर त्यानुसार बांधकाम सुरू करणे गरजेचे होते. परंतु, ८२३१ लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम सुरु केले नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांना दिलेला पहिला हप्ता परत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत लाभार्थ्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून तालुकास्तरावरून नोटीस पाठवण्यात आले आहे.
अर्धापूरलाभार्थी ३३
बिलोली ७२६
देगलूर. ८४२
धर्माबाद ४२६
हदगाव १३४
भोकर १७५४
कंधार ६८५
किनवट३२२
लोहा ९३३
माहूर २५
मुदखेड २१४
मुखेड१०१०
नायगाव ६२८
नांदेड ३९
उमरी२८९
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकाम करण्यासाठी लाभाथ्यांना निधी दिला आहे. वेळ देऊनही बांधकाम झाले
नसल्याने या लाभार्थ्यांना वितरित रक्कम वसूल केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली.