दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनीधी अंगद कांबळे
म्हसळा – महारष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांचा जन्म दिवस संपुर्ण महाराष्ट्रात आरोग्य विभागामार्फत संकल्प निरोगी महाराष्ट्राचा महा आरोग्य शिबिर मोहीमे अंतर्गत म्हसळा ग्रामीण रुग्णालयात आरोग्य शिबिर संपन्न झाला.शिबिरात उपस्थिताना वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुचिता गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित शिबिरार्थिना वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश मेहता,डॉ.अलंकार करंबे,डॉ.महमद रहाटविलकर यांनी आपले आरोग्य हिच आपली धन संपदा असल्याचे निदर्शनास आणून देत कर्तव्य पालकांचे,लसीकरण बालकांचे करणे बाबत समुपदेशन केले.शिबिरात ० ते १८ वयोगटातील बालके व किशोवयीन मुलामुलींचे सर्वांगिन आरोग्य तपासणी करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिपरीचारिका-श्रीम.रविशा पावरी,सिद्धकला काते,युकत्ता तुरे,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्रीम.दिक्षा मोहिते,औषध निर्माण अधिकारी श्री. सागर सानपश्रीम.वैशाली पाटील,नेत्र चिकत्सक अधिकारी श्रीम.नलिनी जाधव आदी आरोग्य कर्मचारी यांनी मेहेनत घेतली.