दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा. दि.09 रोजी इसम नामे मुंजा श्रीरंग काळे रा. पांगरी खुर्द ह.मु. जिंतूर रोड मंठा ता. मंठा जि. जालना यांनी त्यांचे घरासमोर ऊभी केलेली घरसमोरुन लॉकबंद केलेली स्वीप्ट डिझायर कार क्रमांक एम. एच 30 ऐ. झेड 0070 कोणीतरी अज्ञात इसमाने नेले बाबत पोलीस ठाणे मंठा येथे येवून पावने चार वाजता माहिती दिल्याने सदरची माहिती पोलीस अंमलदार ऊत्तम राठोड यांनी मा. पोलीस निरीक्षक स़जय देशमुख यांना देवून त्यांनी रात्रगस्त पेट्रोलींगवर असलेले पोलीस अंमलदार शाम गायके, संदिप राठोड, प्रदिप आढाव (शासकीय वाहाण चालक) यांना दिली व सदर कार क्रमांक एम. एच. ३० ऐ झेड 0070 अशी कोणीतरी अज्ञात इसमाने नेली आहे.
असे कळविल्याने रात्र गस्तचे पोलीस अंमलदार शाम गायके, संदिप राठोड, प्रदिप आढाव (शासकीय वाहाण चालक) यांनी जिंतूर रोडणे वरील कारचा सखोल अंदाज घेवून पाटलाग करत असतांना गाडी नेत असलेल्या इसमाने पोलीस मागे असले बाबत समजल्याने सदची कार हि चारठाणा ता. जिंतुर येथे रोडच्या बाजुला कार पावने पाच वाजेच्या सुमारास सोडुन अंधारचा फायदा घेवून पळुन गेले आहे.
सदरची कार हि कार मालक यांचे ताब्यात दिली असुन त्यांनी पोलीसांचे आभार मानुन मला गाडी मिळाली याचेत खुप समाधान आहे. कार बाबत तक्रार देयाची नाही असे सांगितले आहे.
सर्वाना अहवान आहे की, त्यांनी आपली दुचाकी / चारचाकी वाहन व्यवस्थीत पार्किंग मध्येच लावावेत वाहन लॉक केल्याची व दुचाकी हॅन्डल लॉक झाल्याबाबत खात्री करावी शक्यतो वाहन ज्या ठिकाणी सि.सि.टिव्ही कार्यान्वीत आहे. अशा जागेत लावावे वाहनास अलर्ट सिस्टीम लावून घ्यावी.
संजय देशमुख (पोलीस निरीक्षक मंठा)