
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी -समीर मुल्ला
संवर्ग १ व २ मध्ये बोगस प्रमाणपत्र दाखवून व दिव्यांगाची अधिक टक्केवारी दाखवून लाभ घेणाऱ्या शिक्षकांची वैद्यकीय मंडळामार्फत तपासणी करुन बोगस दिव्यांगावर कार्यवाही करावी अशी मागणी करणाऱ्या दोन महिला शिक्षकांचे कुटुंब संपवून टाकू अशी धमकी एका माथेफीरुने पत्राद्वारे दिली आहे आहे.
या बाबत सविस्तर वृत असे की गेल्या सहा महीन्या पासून राज्यात शिक्षकांची आँनलाईन बदली प्रक्रिया सुरु आहे. या बदली प्रक्रियेत संवर्ग १,२,३ व ४ असे भाग केलेले आहेत संवर्ग भाग १ मध्ये ४० टक्केपेक्षा जास्त टक्केवारी असलेले ,विधवा,परितकत्या,घटस्पोटीत महिला तसेच दुर्धर आजार असलेले व ५३ पेक्षाजास्त वय असलेल्या शिक्षकांचा समावेश होते. त्या संवर्ग १ मधील शिक्षकांना बदलीतून सुट कींवा प्राधान्य मिळते. या बदलीतून सुट घेण्यासाठी कींवा प्राधान्य घेण्यासाठी जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी दिव्यांगाचे व दुर्धर आजारांचे प्रमाणपत्र कींवा बोगस टक्केवारी दाखवून लाभ घेतलेला आहे. या मुळे जे खरे दिव्यांग कींवा दुर्धर आजारी आहेत यांच्यावर तर अन्याय होतोच पण संवर्ग ४ मधील शिक्षकांवर पण अन्याय होत आहे.
त्या मुळे तालुक्यातील कांही शिक्षकांनी व प्रहार शिक्षक संघनेने मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन या सर्व संवर्ग १ मध्ये लाभ घेणाऱ्या शिक्षकांची वैद्यकीय मंडळामार्फत तपासणी करुन बोगस प्रमाणपत्र व बोगस टक्केवारी असलेल्या शिक्षकांवर कार्यवाई करावी अशी मागणी २५ शिक्षकांनी केली होती.
त्या निवेदनावर श्रीमती साधना झालटे प्राथमिक शाळा कन्हेरवाडी व श्रीमती सुनिता गायकवाड प्राथमिक शाळा हावरगाव यांच्या पण सह्या असल्यामुळे या महिला शिक्षकांचे कुटुंब संपवण्याची धमकी संभाजी शिंदे रा.येरमाळा [नाव व गाव बोगस आहे] या नावाने संबंधित महिला शिक्षकांच्या शाळेवर पत्र पाठवून धमकी देण्यात आली आहे.
या धमकीचा आज दुपारी कळंब तालुक्यातील जवळपास २०० महिला व पुरुष शिक्षकांनी जि.प.कन्या : प्रशाला कळंब येथे एकत्र येऊन निषेश नोंदवला
संबंधित प्रकरणात साधना झालटे यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलिसात गु.र. नंबर 86/2023 कलम 506 प्रमाणे अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक एस. के मांयदे करीत आहेत.
चौकशी:-
महिला शिक्षकांना धमकी देणाऱ्या माथेफीरुचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यास अटक करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी व मा.पोलीस अधिक्षक यांच्याकडे करण्यात येणार आहे.
तसेच खरच जे पात्र दिव्यांग व दुर्धर आजारी शिक्षक आहेत त्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे व जे बोगस आहेत त्यांचा शोध घेऊन कडक प्रशासकीय कार्यवाही करावी अशी मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कडे मागणी करण्यात येणार आहे.