दैनिक चालु वार्ता, इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर: निमगाव केतकी येथील स्वर्गीय तुळसाबाई मारुती भोंग यांचे प्रथम पुण्यस्मरण गुरूवार दि. २३/२/२०२३ रोजी आहे. त्यानिमित्त ह.भ.प. मामासाहेब महाराज काजळे (नरसिंहपूर) यांचे सुश्राव्य किर्तन सकाळी १० ते १२ या वेळेत होणार आहे. १२ वाजता स्वर्गीय तुळसाबाई मारुती भोंग यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी निमगाव केतकी व पंचक्रोशीतील नागरिकांनी आणि नातेवाईक यांनी सदरच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन मुलगा कुंडलीक मारुती भोंग, मुलगी रकमाबाई दशरथ शेंडे, रंजना बाळासाहेब बोराटे यांच्यासह भोंग परिवारांच्यावतीने करण्यात आलेले आहे.
तुळसाबाई मारुती भोंग यांचा जन्म सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबामध्ये झालेला.त्यांना एक मुलगा व २ मुली अशी अपत्ये, परिस्थिती अतिशय नाजूक व बेताची होती, तुळसाबाई यांनी कष्ट करून दरिद्री प्रपंचाचे स्वर्गात रुपांतर केले होते.आपली नातवंडे मोठी झाल्यानंतर परिस्थितीची जाणीव असल्याने कर्तबगार निघाली. त्यांनी उद्योग व्यवसायामध्ये निमगाव केतकी व पंचक्रोशीत नाव कमावलेले आहे.गेल्यावर्षी तुळसाबाई मारुती भोंग यांचे दुःखद निधन झालेले होते. प्रतिकूल परिस्थितीत कष्टाच्या जीवावर संसार उभा केला. मुलांचा व नातवांचा संसार तुळसाबाई मारुती भोंग यांना पाहता आला. आपण केलेल्या कष्टाचे चीज झाले, असे त्यांच्या दैनंदिन जीवनातील वागण्यावरून वाटत होते. मात्र काळाने घाला घातला आणि भोंग परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळून बघता बघता वर्ष पूर्ण होत आलेले आहे. भोंग परिवार यांचेकडून प्रथम पुण्यस्मरण निमित्त किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे भोंग परिवार यांच्या वतीने आवाहन केले आहे.