दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड -प्रेम सावंत
गंगाखेड: शहरातील कै.सौ.शेषाबाई सीताराम मुंढे महाविद्यालयामध्ये दिनांक 23फेब्रुवारी ते 25फेब्रुवारी दरम्यान प्राचीन ऐतिहासिक चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या चित्र प्रदर्शनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय परभणी व कै.सौ.शेषाबाई सीताराम मुंढे
कला महाविद्यालय गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
परभणी जिल्हा ऐतिहासिक वारसा कमिटी समन्वयक
सुनील पोटेकर(जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी) यांनी रेखाटलेल्या परभणी जिल्ह्यातील प्राचीन ऐतिहासिक चित्रांचे तीन दिवसीय प्रदर्शन दिनांक 23, 24 व 25 फेब्रुवारी रोजी कै.सौ.शेषाबाई सीताराम मुंढे कला महाविद्यालय गंगाखेड येथील सांस्कृतिक सभागृहात होणार आहे.
परभणी जिल्ह्याचे ऐतिहासिक सांस्कृतिक तसेच पर्यटनाच्या दृष्टिकोनातून
महत्व सर्वांच्या लक्षात यावे. या हेतूने हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे.
गंगाखेड तालुक्यातील तसेच परिसरातील सर्व अभ्यासक, संशोधक, इतिहास प्रेमी नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन आपल्या पुरातन संस्कृतीचा ठेवा अभ्यासावा. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले आहे.
गंगाखेड वासियांसाठी ही एक अनोखी आणि सुवर्णसंधीच म्हणावी लागेल.असे उपक्रम फार दुर्मिळच होत असतात. या कार्यक्रमादरम्यान 23 तारखेला सकाळी ठीक 10.30 वाजता प्रमुख उद्घाटक म्हणून गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
25 तारखेला सकाळी 11.00 वाजता समारोप कार्यक्रम होणार आहे.
यावेळी सुनील पोटेकर (जिल्हा सूचना आणि विज्ञान अधिकारी) यांच्यासह ऐतिहासिक वारसा गटातील इतिहास तज्ञांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदर्शनाचे संयोजक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बालाजी ढाकणे आणि इतिहास विभागाचे प्राध्यापक डॉ.अविनाश खोकले यांनी केले आहे.