दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
पालघर/जव्हार: तालुक्यातील गोरठण येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी भेट देऊन विद्यालयाची पाहणी केली.या भेटीदरम्यान जि.प अध्यक्षांचे बालिका विद्यालयातील मुलींनी लेझीम पथकाच्या माध्यमातून स्वागत केले.यावेळी निकम यांनी शालेय भौतिक व्यवस्था,निवासी मुलींची भोजन व्यवस्था,परिसर स्वच्छता या बाबींचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले.तर अतिशय महत्वाचा असलेला पाण्याचा प्रश्न समजावून घेऊन त्यांनी संबंधित विभागाला तत्काळ पाण्याचा विषय सोडविण्याच्या सूचनाही दिला.
या भेटीवेळी त्यांनी शालेय विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन करून मुलींचे मनोबल वाढविले.विद्यालयीन कर्मचाऱ्यांनी शालेय व्यवस्थापनात येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचून येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याकडे मागणी केली.या समस्या लवकरात लवकर सोडविल्या जातील असे आश्वासन देऊन जि.प अध्यक्ष्यांनी बालिका विद्यालयातील मुलींसोबत जेवणाचा ही आनंद घेतला.