दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर / प्रतिनिधी
देगलूर शहरात २६ फेब्रुवारी रोजी कै. डॉ. सुशीला एकलारे यांच्या स्मरणार्थ संजीवन वूमन्स स्पेशालिस्ट हॉस्पीटलमध्ये मोफत महिला व पुरुष कर्करोग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
कर्करोग तपासणी व्यतिरिक्त स्त्रीरोग निदान, महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या, पांढरे पाणी समस्या, गरोदर महिलांची तपासणी, गर्भाशय वरील सुज व गाठी, वंध्यत्व निदान व उपचार तसेच रुग्णांची पॅप्स स्मिअर तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरात कॅन्सर तज्ञ डॉ. आनंद भगत, स्त्रीरोग तज्ञ डॉ. एस. एम. एकलारे, डॉ. कपील एकलारे, डॉ. एस. के. एकलारे आदि डॉक्टर मंडळी रुग्णांची तपासणी करणार आहेत. या शिबिरात ज्या रुग्णांना तपासणी करून घ्यायची आहे त्यांनी डॉ. कपील एकलारे, डॉ. मुजीब शेख, डॉ. कुलदीप येरमूने यांच्याकडे नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.