दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधि
देगलूर तालूक्यातील सांगवी (क) येथे ता.१८ फेब्रुवारी पासून चालू असलेल्या हरिनाम सप्ताह्याचे सांगता २५ फेब्रुवारी या दिवशी करण्यात आले.
ता.१८ रोज शनिवार ह.भ.प.सतिश महाराज लिंगापूर,ता.१९ रविवार ह.भ.प. संतोष महाराज कुशावाडीकर,ता.२०सोमवारी ह.भ.प.हाणमंत महाराज कंठाळीकर,ता.२१मंगळवार ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज गुरुजी नांदेडकर,ता.२२बुधवार ह.भ.प.संतोष महाराज उदगीरकर,ता.२३गुरुवारी ह.भ.प. परमेश्वर महाराज औराळकर,ता.२४शुक्रवारी ह.भ.प.योगेश महाराज वसमतकर यांचे किर्तन झाले तर ता. २५ शनिवार रोजी काल्याचे किर्तन ह.भ.प. राम महाराज बोरुळकर यांचे किर्तनाने सप्ताह सांगता करण्यात आले. ह.भ.प.किशन महाराज हंगरगेकर हे विना प्रमुख तर ह.भ.प.शिवाजी देवराय वरखिंडे गवंडगाकर हे गाथा पारायन केले.या
भागवतचार्य ह.भ.प.योगेश महाराज कानगावकर आळंदी देवाची यांचे भागवत कथेचे निरुपण केले, या अखंड हरिनाम सप्ताहमध्ये सुप्रसिध्द गायक तथा आंळदी देवाची येथील संगित अंलकार संतोष महाराज मलकापूरकर,संगित विशारद माऊली महाराज भंडारे या गायणाचार्या सह आळंदी देवाची येथील सुप्रसिध्द मृदंगाचार्य तथा मृदंगसम्राट ज्ञानेश्वर महाराज खोटे,माऊली महाराज लिंगे यांच्यासह ओमकार काळे यांच्यासह नामवंत गायक व वादकाची उपस्थिती होती.या अखंड हरिनाम सप्ताहाचे पंचक्रोशीत भाविक भक्तांची व ग्रामस्थाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.