दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
सर्वाधिक काळ चेअरमन पदाचा विक्रम : 32 वर्ष एकहाथी सत्ता.
भुम:- वाशी तालुक्यातील पारगाव वी.का.सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी बाबुशेठ डुंगरवाल यांची निवड झाली असून सर्वाधिक काळ चेअरमनपदी राहण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावे नोदवला गेला आहे.
पारगाव सोसायटी म्हणजे बाबुशेठ हे समीकरण पारगाव पंचक्रोशीत ठरलेलंच आहे.कारण मागील ३२ वर्षापासून सोसायटीच्या चाव्या त्यांच्याच हातात आहेत. स्वच्छ व पारदर्शी कारभार यामुळेच पारगावातील शेतकरी मतदारांनी नेहमीच त्यांना बहुमताने विजयी केले आहे. माजी आमदार राहुल भैया मोटे यांच्या विश्वासू म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.काही दिवसापर्वीच पारगाव सोसायटीची निवडणूक पार पडली.अनेक गावातील मातबर रिंगणात उतरले होते.मात्र बाबूशेठच्या पॅनल समोर १३ पैकी फक्त २ जनालाच निडणुकीत विजय मिळवता आला.तोही अतिशय कमी मताने.आज निवडणूक अधिकारी व्ही.डी.कद्रे यांच्या उपस्थितीत चेअमनपदी बाबुशेठ डुंगरवाल यांची तर व्हाचेअरमनपदी शारदा काटवटे यांची निवड करण्यात आली.दरम्यान गावात अनेक अफवाचे बाजार सुरू होते,मात्र तीजोरीची चावी बाबुशेठ डुंगरवाल यांच्याच हाथी राहीली.