दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम :- शहरातील प्राईड इंग्लिश स्कूल मध्ये स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. शौर्य शिर्के याने मुख्याध्यापक म्हणून शालेय कामकाज आणि एक दिवसीय प्रशासन चालवले. प्राईड इंग्लिश स्कूल च्या युकेजी वर्गाच्या विद्यार्थ्याच्या वतीने स्वयंशासन दिनाचे आयोजन केले होते. प्रारंभी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, यशस्वी जीवनाची पायाभरणी ही शालेय शिक्षणातूनच होते. नंतरच्या काळात उच्च शिक्षण घेतानाच निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच पुढील वाटचाल केली पाहिजे.
विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिनातील सहभाग हा केवळ शिक्षक होण्याचा अनुभव देणारा नसून, भविष्याला आकार देणारी रूची, कला दर्शविणारे एक प्रतीक असते. मुख्याध्यापक, शिक्षक, लिपीक, सेवक व विद्यार्थी यांच्या तांत्रिक सुसंवादाची जाणीव निर्माण होते. स्वयंशासन हा एकदिवसीय अनुभव अन् आनंद वाढवणारा असतो. तसेच भविष्यात यशाची दिशादर्शक ठरतो म्हणून विद्यार्थ्यांनी ही आठवण आयुष्यभर जपतो. यावेळी अथर्व डांगे हा उपमुख्याध्यपक तर श्रावणी नवले ही गट शिखणाधिकारी झाली होती तर हसीब शेख, मारुती शेंडगे, शिवराज लष्कर, आदिश्री बोत्रे, आरव टकले, यांनी शिक्षक म्हणून कार्य पार पाडले.. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याणी असलकर, सरस्वती पाटील व मेघा सुपेकर यांनी परिश्रम घेतले.