दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथील संत बाळुमामा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामास बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून सुरुवात.दि. 11जानेवारी रोजी संत बाळुमामा यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कीर्तन, महाप्रसादाच्या कार्यक्रमांस उपस्थित असता आमदार बबनराव लोणीकर यांनी बोलताना मंदिराच्या रस्त्यासाठी पाच लक्ष रुपये निधी देण्याचा शब्द सर्व भाविक भक्तांना दिला होता.अवघ्या एक महिन्यातच दि.24 फेब्रुवारीपासून त्यांच्या प्रयत्नातून रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे म्हणून त्यांना दिलेला शब्द पाळणारा नेता आमदार बबनराव लोणीकर असे संबोधले जाते. पावसाळ्यात भक्त मंडीळीला दर्शनसाठी मंदीराकडे जातांना होणारा त्रास कमी होणार असल्यामुळे केहाळ वडगाव व पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळी आमदार बबनराव लोणीकर यांचे आभार मानत आहेत .