दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी -दीपक कटकोजवार
चंद्रपूर शहरातील दादमहल वार्ड परिसरातील प्रसिद्ध व पुरातन कोहिनूर क्रिडांगण मध्ये तमाम मुस्लिम जमात -खवातीन ए जमात संघटनेच्या वतीने दि.२६/०२/२०२३ ला रात्री ८:०० वाजता मुस्लिम इस्तेमा निकाह समारोह कार्यक्रम भव्यदिव्य प्रमाणात संपन्न झाला. या निकाह समारोहात स्थानिक आमदार किशोरभाऊ जोरगेवार , मनपा चे माजी स्थायी समिती सभापती नंदूभाऊ नागरकर ,अध्यक्षा शाईन शेख मॅडम, वरोरा माजी नगराध्यक्ष जनाब एहतेशाम अली आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. समारोह आयोजकांच्या वतीने मान्यवरांचे शाल,मोमेन्टो व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.