दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:आज महात्मा फुले इंग्लिश स्कूल देगलूर येथे शाळेचे सचिव आदरणीय उमेश बापूराव पाटील जाधव हाळीकर सर यांच्या वाढदिवसा निमित्त युवा शिवसेना जिल्हा चिटणीस धनाजी जोशी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले व वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवस साजरा करताना शाळेचे मुख्याध्यापक गिरी सर व शिक्षक सोहेल सर, रसूल सर, आडेकर सर, लतिफ सर, शेख मॅडम व इतर कर्मचारी साहेबांना वाढदिवसाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देण्यात आले.