
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -राम पाटील क्षीरसागर
लोहा तालुक्यातील आडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव येथील शाळेस एलईडी लाईट भेट दिली यावेळी गजानन पाटील क्षीरसागर म्हणाले की आपली शाळा ही एक मंदिरच आहे येथुन च आपण शिकलो मोठे झालो शाळेला गावाचा आधार ,गावाला शाळेचा आधार या म्हणीप्रमाणे आपण सर्व गावकरी व तरुण मंडळींनी एकत्र येऊन आपली शाळा डिजिटल करण्यासाठी काम केले तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपली शाळा प्रथम असेल असे मनोगत व्यक्त केले. त्याप्रसंगी व शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड साहेब सह शिक्षक मंगनाळे सर, गिजे सर, पुरी सर, कदम सर, कोंडे सर, गोणारे सर आदी गावांतील मंडळी काळेश्वर बोमनाळे उपस्थित होते..