
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी -समीर मुल्ला
तालुक्यातील खोदला येथील एका शेतकऱ्याची अज्ञात चोरट्याने 43 पोते सोयाबीन व एक पोते हरभरे चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्याने खोंदला परिसरात मोठी खळबळ उडाली आहे , तर अज्ञात चोराविरुद्ध क ळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत अधिक वृत्त असे की तालुक्यातील खोंदला येते ज्ञानेश्वर मुळीक यांच्या घराशेजारी असणाऱ्या जनावराच्या खोलीमधून अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून १४० कट्ट्या पैकी ४३ कट्टे सोयाबीन व १० कट्टे हरभरा पैकी १ कट्टा हरभऱ्याची अज्ञात चोरांनी वाहनाद्वारे चोरी केली आहे .यात ज्ञानेश्वर मुळीक या शेतकऱ्याचे जवळपास १ लाख २७ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे . ही सर्व घटना दि. १मार्च च्या मध्यरात्री घडले आहे . ही सर्व घटना २ मार्च रोजी सकाळी उठल्यानंतर ज्ञानेश्वर मुळीक यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या सोयाबीनच्या ठेवलेल्या कट्ट्या ची नीट मोजणी केली असता त्यातील काही कट्टे गायब असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांचा संशय बळावला व चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला त्यानंतर त्यांनी तात्काळ कळंब पोलिसात धाव घेऊन सर्व हकीगत पोलिसांना सांगण्यात आली यावरून कळंब पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गु . र . नं . १०९ कलम ४६१ , ३८० भादवी प्रमाणे गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा पुढील तपास पोहे का मनोहर दळवी हे करत आहेत . या घटनास्थळाला पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे . सध्या खोंदला परिसरात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे चोराचा तात्काळ छडा लावावा अशी मागणी गावकऱ्यातून जोर धरत आहे . तर पोलिसांनी रात्रीच्या गस्तीचे प्रमाण वाढवून चोराच्या मुसक्या आवळ्याण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे .