दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
पुणे दि. पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील २१५ कसबा विधानसभा मतदारसंघातील नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीत बहुजन जनता दल कडून विजयासाठी जाहीर पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचा ४० वर्षा पासून
बालेकिल्ला समजला जाणारा कसबा विधानसभा मतदार संघ याच मतदारसंघात भाजपा उमेदवारांचा पराभव करून मोठ्या मोठ्या ठिकाणी विजय मिळवला त्याबद्दल पुणे शहरासह राज्यात बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली बहुजन जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला असे बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी सांगितले आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघाचे पोटनिवडणूक बहुजन जनता दलाचा जाहीर पाठींबा असलेले आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांना कसबा विधानसभा मतदारसंघातील दलित बहुजन मतदारांनीआणि बहुजन जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मतदान करून आमदार रवींद्र धंगेकर यांना निवडून देवुन विजय मिळवून दिला त्याबद्दल राज्यातील बहुजन जनता दल कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी फटाक्याची आतिष बाजी करून काँग्रेस पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि समविचारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या कडून एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव राज्यात साजरा करण्यात आला
यावेळी कैलास देशभ्रतार. अश्विन चांदुरकर. शिवाजी थोरात . शैलेश बदाने . दिलीप बिरुटे रोहित लांडगे.संजय पाटील आनंद गजभिये महेंद्र इंगळे धनराज माने किशोर कदम याकुब शाहा महेंद्र राठोड हिम्मत पाटील रोहन जुवेकर दिपक कांबळे विशाल खंडेराव राजेश गायकवाड शांताराम यवतकर दिपक ससाने विजय काळे दशरथ यादव तुकाराम झेंडे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस बहुजन जनता दलाच्या कार्यकर्त्यासह समजते पक्षाची कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी कळविले आहे