दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
प्रतिनिधी: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना गंगापूर यांच्यावतीने मराठी भाषा दिनानिमित्त काव्य वाचण स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरित करण्यात आले यावेळी रस्ते स्थापना विभागाचे उपजिल्हा संघटक अशोक कराळे, तालुका संघटक संतोष लाड, संस्कार इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीमध्ये संत तुकाराम प्राथमिक शाळा व संस्कार इंग्लिश स्कूल येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज पुंडेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला होता ढोरेगाव येथील आयुष क्लिनिकचे डॉक्टर किरण लिंबे यांच्यावतीने या उपक्रमासाठी बक्षीस देण्यात आले होते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे योगेश मुरकुटे, योगेश सोनवणे, आदित्य लाड, यासह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थि सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते