दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांचे पुरोगामी विचार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी केलेले सामाजिक व शेतकरी,शेतमजूर जनतेसाठी आजपर्यंत केले काम तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी आमदार अँड.जयदेव गायकवाड यांनी मिलिंद सोनकांबळे कावळगावकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड व नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिले.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष पंडित कांबळे ,सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सचिव लक्ष्मण सुरनर उपस्थित होते.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागचे अध्यक्ष अँड.जयदेव गायकवाड ,प्रदेश उपध्यक्ष पंडित कांबळे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस तथा माजी जि.प.उपाध्यक्ष रमेश देशमुख शिळवणीकर,सामाजिक न्याय विभागचे प्रदेश सचिव लक्ष्मण सूरनर,राष्ट्रवादी नांदेड जिल्हा ग्रामीण अध्यक्ष हरिहरराव भोसीकर ,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष दिगंबर जवळे,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पद्दमवार ,राष्ट्रवादीचे देगलूर तालुका अध्यक्ष अँड.अंकुश देसाई देगावकर ,विधानसभा अध्यक्ष बालाजी रोयलावार ,माजी उपनगरध्यक्ष अविनाश निलमवार ,ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष माधव अण्णा फुलारी ,माजी पं.स.सदस्य रमेश शिवनीकर व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सहकारी मित्र यांनी माझ्यावर विश्वास दाखवल्या बद्दल मिलिंद कावळगावकर यांनी
आभार मानले,मिलिंद कावळगावकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल सामाजिक राजकीय व विविध क्षेत्रातील लोकांकडून त्यांच्यावर अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.